Header

Pune Crime News | भाजपचे नेते गणेश बिडकरांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | भाजपचे नेते गणेश बिडकरांवर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मतदानासाठी पैसे वाटप करणार्‍यांना रोखण्याचा प्रयत्न करीत असलेल्यांना शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्या प्रकरणी भाजपचे नेते गणेश बिडकर (BJP Leader Ganesh Bidkar) यांच्यासह चौघांवर समर्थ पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी फैयाज कासाम शेख (वय ३८, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११६/२३) दिली आहे. त्यानुसार गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्स येथे रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे युवक काँग्रेसचे पुणे कॉन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष असून ते मालधक्का चौकात त्याचे मित्र याकुब बशीर शेख यांच्यासह फिरत होते.
त्यावेळी आएशा कॉम्प्लेक्समध्ये भाजपाचे कार्यकर्ते हे मतदारांना पैशांचे वाटप करीत आहेत,
अशी माहिती त्यांना मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी ते तेथे गेले. त्यावेळी गणेश बिडकर, मयुर चव्हाण,
नईम शेख, बाला शेख हे उभे असल्याचे दिसले.
त्यांच्या हातामध्ये केशरी रंगाची पिशवी व मतदारांचे स्लिपा दिसल्या व या पिशव्यामध्ये पैसे असून ते मतदारांना वाटत असल्याबाबत त्यांनी विचारणा केली.
तेव्हा फिर्यादी व त्यांचा मित्र याकुब शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धक्का देऊन तेथून
ते पळून गेले. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Case registered against BJP leader Ganesh Bidkar

 

हे देखील वाचा :

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Jalgaon Crime News | पत्नीच्या निधनाची बातमी ऐकताच काही तासांनी पतीनेही सोडला जीव

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘कसबा मतदारसंघातील जुने वाडे, धोकादायक इमारती, हेरीटेज वास्तूंचे पुनर्विकास करणार’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

 

The post Pune Crime News | भाजपचे नेते गणेश बिडकरांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article