Header

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

पोलादपूर : बहुजननामा ऑनलाईन Raigad Crime News | कोकणात दारूच्या नशेत आत्महत्या करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा 55 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. हि घटना पोलादपूर तालुक्यातील माटवण या ठिकाणी घडली आहे. (Raigad Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत व्यक्तीचे नाव राजेश पांडुरंग गायकवाड असे होते. त्यांना दारूचे व्यसन होते व त्यांनी नैराश्यपोटी शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह सरकारी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता पाठवला. यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या आत्महत्या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत. (Raigad Crime News)

 

कोकणात दिवसेंदिवस दारू पिऊन व्यसनाधीन लोकांचं आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
हि खूप चिंताजनक बाब आहे.
दारूमुळे होणाऱ्या आत्महत्या या भविष्यात चिंतेचा विषय करू नये यासाठी पोलीस प्रशासनाला दारूभट्ट्यांच्या विरोधात तीव्र कारवाई करावी लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दारू भट्टयांच्या
विरोधात धडक मोहीम राबवली आणि त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात दिसू लागला त्यामुळे तशी मोहीम रायगड जिल्ह्यातही हाती घेणे आवश्यक आहे.

 

 

Web Title :- Raigad Crime News | in poladpur of raigad district there is an increase in cases of putting an end ones life due to drunkenness

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Ranbir Kapoor | रणबीर कपूर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये नाही तर ‘या’ दिग्गज गायकाच्या बायोपिक मध्ये झळकणार; अभिनेत्याने केला खुलासा

Pune Crime News | भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

 

The post Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article