Header

Pune Crime News | कात्रजमध्ये लूटमारीस विरोध करणार्‍या तरुणाचा खून एकास अटक; अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

Pune Crime News | कात्रजमध्ये लूटमारीस विरोध करणार्‍या तरुणाचा खून एकास अटक; अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कात्रज भागात लूटमारीस विरोध करणार्‍या पादचारी तरुणाला बांबूने बेदम मारहाण करुन त्याचा खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) एकास अटक (Arrest) केली असून त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महादेव नागनाथ चेंडके (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९, रा. काका वस्ती, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. शिंदे याचा चौदा वर्षाच्या अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज येथील गुडलक मोटरर्स व हेमी प्लाझा बिल्डींग समोर २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता घडली होती. (Pune Crime News)

 

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात (Sub-Inspector of Police Atul Thorat) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. चेंडके मजुरी करतो. तो धनकवडीतील चैतन्यनगर परिसरातून निघाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास त्याला आरोपी शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने चेंडकेला अडवले. त्याला धमकावून पैसे मागितले. चेंडकेने नकार दिल्यानंतर दोघांनी त्याला बांबुने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या चेंडकेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रदीप शिंदे याला अटक करण्यात आली. शिंदे याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Crime News | One arrested for killing youth who opposed looting in Katraj; Offense against a minor

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | उरुळी कांचन येथील दारु अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

Pune Crime News | अपहरण करुन खून करणाऱ्या फरार आरोपीच्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

The post Pune Crime News | कात्रजमध्ये लूटमारीस विरोध करणार्‍या तरुणाचा खून एकास अटक; अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article