Header

Shiv Dhanushya Yatra | ठाकरे गटाच्या ‘शिवसंवाद’ आणि ‘शिवर्गजना यात्रे’ला शिंदे गटाकडून ‘शिवधनुष्य यात्रे’ने प्रत्युत्तर

Shiv Dhanushya Yatra | ठाकरे गटाच्या ‘शिवसंवाद’ आणि ‘शिवर्गजना यात्रे’ला शिंदे गटाकडून ‘शिवधनुष्य यात्रे’ने प्रत्युत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) शिवगर्जना यात्रेचे (Shivagarjana Yatra) आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असून शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल करत आहेत. ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला शिंदे गटाकडून शिवधनुष्यबाण यात्रेने (Shiv Dhanushya Yatra) प्रत्युत्तर दिले जाणार आहे. शिवसेना (Shivsena) राज्यभरात शिवधनुष्य यात्रा (Shiv Dhanushya Yatra) काढणार आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’ असं या यात्रेची टॅगलाईन असणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे नेते मार्च अखेर अयोध्येला (Ayodhya) जाणार आहेत. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो ‘शिवधनुष्य यात्रे’च्या (Shiv Dhanushya Yatra) माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यात येणार आहे.

 

शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर शिंदे गट भर देणार आहे. अभियानाची जबाबदारी निष्ठावान नेत्यांवर सोपवली जाणार आहे. शिवसेनेचे नेते या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा या यात्रेच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे.

 

ठाकरे गटाची शिवसंवाद यात्रा

ठाकरे गटाने 25 फेब्रुवारीपासून राज्यात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु केले आहे.
25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे.
शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करत आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या अभियानाची जबाबदारी सुभाष देसाई (Subhash Desai), खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut),
अरविंद सावंत (Arvind Sawant), ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), प्रियंका चतुर्वेदी
(Priyanka Chaturvedi), अनंत गीते (Anant Geete), चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire),
नितीन बानगुडे पाटील (Nitin Bangude Patil) या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Shiv Dhanushya Yatra | shivsenas shiv dhanushya yatra will be held in the state by eknath shinde to target uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मोफत धान्याची लालुच दाखवून ज्येष्ठ महिलेला लुबाडले

Pune Crime News | NDA मध्ये नोकरीच्या आमिषाने 28 लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

The post Shiv Dhanushya Yatra | ठाकरे गटाच्या ‘शिवसंवाद’ आणि ‘शिवर्गजना यात्रे’ला शिंदे गटाकडून ‘शिवधनुष्य यात्रे’ने प्रत्युत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article