Header

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Kasba Peth Bypoll Election | काँग्रेस (Congress) सारख्या दिशाहीन पक्षाचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार? पुण्यात मेट्रोचे (Pune Metro) जाळे वाढवायचे असेल, वाड्यांचा, गुंठेवारी प्रश्नाचा पाठपुरावा करुन सोडवायचा असेल तर हेमंत रासने (Hemant Rasane) विधानसभेत पाहिजेत, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूकीतील (Pune Kasba Peth Bypoll Election) शिवसेना व भाजप महायुतीचे (Shiv Sena BJP Alliance) उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ नातूबाग येथे ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित केला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan), माजी खासदार संजय काकडे (Former MP Sanjay Kakade), माजी मंत्री दिलीप कांबळे (Former Minister Dilip Kamble), सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao), शैलेश टिळक (Shailesh Tilak), कुणाल टिळक (Kunal Tilak), रिपाईचे परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar), लहूजी शक्ती सेनेचे (Lahuji Shakti Sena) विष्णू कसबे (Vishnu Kasbe) उपस्थित होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभेत निवडून जाण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार लागतो. विधानसभा ही कायदे करण्यासाठी असते. विधानसभा ही राज्याची दिशा ठरवणारी असते. त्याला सत्तेत असणारा पक्ष लागतो. धंगेकर त्याठिकाणी जाऊन कायदा तयार करणार का? त्यांना काहीही करता येणार नाही.

 

रविंद्र धंगेकर यांच्या पक्षाला लोकसभेमध्ये (Lok Sabha) विरोधी पक्षनेता देखील मिळाले नाही. जे विश्वासघाताने आलेलं सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये तुम्हाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळालं. तुम्हाला तेही सांभाळता आलं नाही. बारा कोटी महाराष्ट्राच्या विधानसभेला जवळपास सव्वादोन वर्ष विधानसभेचा अध्यक्षच नव्हते. कारण तुमचे एकमतच होत नव्हतं. एक चांगलं पद मिळालं होतं तेही तुम्ही सोडलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावर खूष होते. या काळात सत्ता चालवली, उपभोगली ती राष्ट्रवादीने (NCP). तुम्हाला असली मंत्रीपद दिली की त्या मंत्रीपदाला काहीच अर्थ नव्हता, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष भाजपचे आहेत.
देशातील 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. राज्यात आपली सत्ता आहे.
एवढी ताकद असताना कसब्यातून उमेदवार निवडून आला पाहिजे.
हे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) कोण आहेत? धंगेकर विधानसभेत येऊन काय करणार,
काय विकास निधी आणणार, कोण विकास निधी देणार, त्यांचे कायदा विषयातले ज्ञान काय,
कायदा कशासोबत खातात हे त्यांना माहिती आहे का? वाड्यांचा, गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी,
मेट्रोचे जाळे वाढवण्यासाठी हेमंत रासने विधानसभेत गेले पाहिजेत, धंगेकर चांगला पण ते तुमच्या समस्या सोडवू
शकणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

मुक्ता टिळक (Mukta Tilak) महापौर झाल्यानंतर समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु झाले.
त्यांनी ही योजना आणल्याने या योजनेला मुक्ता टिळक यांचे नाव दिले पाहिजे.
महापालिका प्रशासनाने हा निर्णय घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | congress candidate vidhansabha chandrakant patil bjp politics pune kasaba vidhansabha bypoll election

 

हे देखील वाचा :

Nashik Crime News | आई-बाबांना शेतात मदत करायला गेली असताना 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू

Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Onkar Bhojane | हास्य जत्रा फेम ओंकार भोजनेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

 

The post Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article