Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढला, भाजपने अखेरच्या क्षणी सामना फिरवला?
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) विरुद्ध भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात मुख्य लढत होत आहे. नुकतेच झालेले संत्तांतर आणि निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयानंतर या पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अधिक संघर्ष पाहायला मिळाला. कसबा पेठ पोटनिवडणुकीत 50.06 टक्के झाले असून शेवटच्या तासात मतदान वाढल्याने ही निवडणूक चुरशीची झाल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) सकाळच्या सत्रात मतदानासाठी उत्साह असल्याचे दिसले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले आणि मतदान करुन कामावर जाणाऱ्या मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. कसब्यात सकाळच्या पहिल्या दोन तासात सहा टक्के मतादन झाले. मात्र त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
रविवार, सोमवार मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार पेठांसह महात्मा पुळे आणि भवानी पेठेत सकाळपासून मतदानासाठी उत्साह होता. दुपारी 11 ते 3 या वेळेत या भागात मतदानाचा टक्का कमी होता. मात्र त्यानंतर सायंकाळी मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर प्रवेश द्वारापर्यंत आलेल्या मतदारांना आत घेऊन त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात आली.
फडणवीसांचा ‘रोड-शो’ भाजपच्या पथ्यावर
मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राह्मण समाजात नाराजी पसरली होती. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेला ‘रोड शो’ भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. शनिवार पेठ आणि सदाशिव फेठेत 35 हजारांहून अधिक, तर नवी पेठ, पर्वती याठिकाणी 18 हजारांहून अधिक मतदान झाले. यामुळे नाराज असलेले मतदार मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत ही शक्यता भाजप कार्यकर्ते आणि RSS ने दूर केल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उमेदवारांची वाढली घालमेल
मतदानाची टक्केवारी वाढू लागल्यानंतर भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी खटके उडाले.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर तणाव होता. काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या.
कसब्यात दुपारी तीन पर्यंत 30 टक्के मतदान झाल्याने मतदारांनी पोटनिवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवल्याची चर्चा होत होती.
तसेच कसब्यात 35 टक्के मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र शेवटच्या तासात मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला.
मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
2 मार्चला मतमोजणी
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी होणार आहे.
कसब्यातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील वखार महामांडळाच्या गोदामात होणार आहे.
तर चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव येथे होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | kasba by election voting percentage analysis brahmin cast bjp hemant rasne vs congress ravindra dhangekar
हे देखील वाचा :
Pimpri Chinchwad News | जुन्या सांगवीतून 57 वर्षीय व्यक्ती तीन महिन्यापासून बेपत्ता
Ritwik Dhanwat | ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड
The post Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढला, भाजपने अखेरच्या क्षणी सामना फिरवला? appeared first on बहुजननामा.