Header

Kolhapur Crime News | कोल्हापुरात काका-पुतण्यामध्ये जोरदार भांडण; एकमेकांवर धारदार शस्त्राने केले वार

Kolhapur Crime News | कोल्हापुरात काका-पुतण्यामध्ये जोरदार भांडण; एकमेकांवर धारदार शस्त्राने केले वार

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन  Kolhapur Crime News | कोल्हापूरमध्ये कौटुंबिक वादातून काका पुतण्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (26 फेब्रुवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्यायनी कॉम्प्लेक्सजवळ हि हाणामारीची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हि घटना घडल्याचे समजत आहे. यामध्ये काका आणि पुतणे असे तिघेजण जखमी झाले आहेत. सतीश वसंतराव रोकडे (वय 57 वर्षे), अभिजित राजेंद्र कांबळे (वय 28 वर्षे), ओंकार राजेंद्र कांबळे (वय 28 वर्षे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Kolhapur Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
सतीश रोकडे आणि राजेंद्र कांबळे हे कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रोकडे आणि कांबळे कुटुंबीयांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि दोन्हीकडून एकमेकांवर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. यामध्ये ओंकार आणि अभिजित यांच्या छातीवर वार करण्यात आला. तर सतीश रोकडे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली आहे. (Kolhapur Crime News)

 

या तिघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतरही त्यांच्यात बाचाबाची होऊन भांडणास सुरुवात झाल्याने त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांना समजताच त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले.

 

 

Web Title :- Kolhapur Crime News | cousins clash in kolhapur stab each other with sharp weapons

 

हे देखील वाचा :

Onkar Bhojane | ‘कलावती’ चित्रपटाबाबत ओंकार भोजनेने केले मोठे वक्तव्य; म्हणाला “मी असा कधी विचार केला…”

Pimpri Chinchwad News | जुन्या सांगवीतून 57 वर्षीय व्यक्ती तीन महिन्यापासून बेपत्ता

Ritwik Dhanwat | ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड

 

The post Kolhapur Crime News | कोल्हापुरात काका-पुतण्यामध्ये जोरदार भांडण; एकमेकांवर धारदार शस्त्राने केले वार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article