Header

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police API Suspended | कोणती परवानगी न घेता मोक्कातील आरोपीला लॉकअ‍ॅप बाहेर काढून घरझडतीसाठी घेऊन जाऊन आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचार्‍याला सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) यांनी निलंबित केले आहे. (Pune Police API Suspended)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहायक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे (API Ramdas Zumber Mundhe) आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव (Police Naik Mahesh Rajendra Jadhav) अशी त्यांची नावे आहेत. मार्केट यार्ड येथील आंगडियाच्या कार्यालयात शिरुन अविनाश गुप्ता याच्या टोळीने (Avinash Gupta Gang) गोळीबार करीत तब्बल २८ लाख रुपये लुटून नेले होते (Firing In Market Yard Pune). याप्रकरणी पोलिसांनी गुप्ता याच्या टोळीला अटक केली. त्यांच्यावर पोलीस आयुक्त रितेशकुमार (CP Retesh Kumaarr) यांनी गेल्या महिन्यात मोक्का कारवाई MCOCA (Mokka Action) केली होती.

 

त्याचा तपास वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला होता.
असे असताना रामदास मुंढे व महेश जाधव यांनी यातील ९ आरोपींपैकी संतोष पवार व साई कुंभार यांना कोणतीही
परवानगी न घेता पोलीस कोठडीतून बाहेर काढले.
त्याला घर झडतीसाठी खानापूर येथे घेऊन येत असल्याचे साई कुंभार याचा मित्र राकेश नवसरे याला मोबाईलवरुन
सांगितले. कोणताही पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता दोघांना खानापूरला घेऊन गेले.
त्यातून संतोष पवार हा पळून गेला.
आरोपी पळून जाण्यास पोलिसी कर्तव्यात बेजबाबदार व बेफिकीर गैरवर्तन कारणीभूत ठरल्याने
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दोघांना निलंबित केले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Police API Suspended | API Ramdas Mundhe And Police Naik Mahesh Jadhav Suspended

 

हे देखील वाचा :

Yash Chopra | ‘या’ दिवशी होणार ‘The Romantics’ ही सीरिज प्रदर्शित; यश चोप्रांच्या आयुष्याला मिळणार उजाळा

Sonam Kapoor | “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितला आपल्याबाबत घडलेला धक्कादायक प्रसंग

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

 

The post Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article