Header

Womens IPL | बीसीसीआयचे अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी पार पडणार महिलांच्या आयपीएलचा लिलाव; जाणून घ्या

Womens IPL | बीसीसीआयचे अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी पार पडणार महिलांच्या आयपीएलचा लिलाव; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन –  या वर्षांपासून महिलांची आयपीएल (Womens IPL) पार पडणार आहे. या आयपीएलची घोषणा बीसीसीआयने अगोदरच केली होती. हि स्पर्धा सुरु होण्याच्या अगोदर महिलांच्या आयपीएलचा (Womens IPL) लिलाव पार पडणार आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा लिलाव कोणत्या तारखेला आणि कुठे घ्यायचा याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काही दिवसांपूर्वीच 19 वर्षांखालील महिलांच्या संघाने विश्वकप जिंकला होता. या संघाचे नेतृत्व शेफाली वर्मा हिने केले होते. भारताचा माजी खेळाडू मास्टर – ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत बीसीसीआयने विश्वविजेत्या महिला संघाला पाच कोटी रुपयांचे बक्षिस प्रदान केले होते.या विश्वविजयामुळे महिलांच्या आयपीएलला चांगला पाठिंबा मिळेल, असे मत सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले होते. (Womens IPL)

 

यानंतर बीसीसीआयने या लिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे.
हा लिलाव आता मुंबईमध्ये पार पडणार आहे.
13 फेब्रुवारी रोजी हा लिलाव मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला येथील संकुलामध्ये जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर ही एक मोठी इमारत आहे.
या इमारतीमध्ये एक सांस्कृतिक केंद्र आहे.
या सांस्कृतिक केंद्रात एकाच वेळेला बरेच कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.
त्यामुळे ही जागा महिला आयपीएलच्या लिलावासाठी पुरेशी आहे.
हा लिलाव पार पडल्यानंतर महिलांच्या आयपीएलचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता कोणत्या महिला खेळाडूला मोठी बोली लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Womens IPL | bcci has decided when and where the womens ipl auction will be held

 

हे देखील वाचा :

Ravikant Shukla | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण

Pune Crime News | धक्कादायक! पुण्यातील शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या, विषप्राशन करुन संपवलं जीवन; राजकीय वर्तुळात खळबळ

 

The post Womens IPL | बीसीसीआयचे अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी पार पडणार महिलांच्या आयपीएलचा लिलाव; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article