Header

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Maharashtra Unseasonal Rain | राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

 

 

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

 

 

आधीच पिकांना भाव नाही, त्यातच अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हजेरी लावली.
त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाने शेताती उभी पिक भुईसपाट झाली आहेत.
गंगापूर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. गहू, हरबरा, पिके आडवी झाली आहेत. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Maharashtra Unseasonal Rain | cm eknath shinde order panchnama of farmers crops damaged due to unseasonal rain

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दिघीतील घटना; दोन सख्ख्या भावांना अटक

Beed Crime News | भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर रॉडने हल्ला, गंभीर जखमी

Maharashtra Politics | ‘पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका…’, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मनसे नेत्याचा खोचक टोला

 

The post Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article