Header

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी पहाटे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. (MNS Sandeep Deshpande)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

संदीप देशपांडे हे नेहमीप्रमाणे मॉर्निग वॉकसाठी शिवाजी पार्कला (Shivaji Park) गेले होते. ते एकटेच होते. ते चालत असताना शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चार ते पाच जण बसले होते. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. संदीप देशपांडे हे चालत त्यांच्यासमोरुन जात असताना अचानक कट्ट्यावर बसलेले हे हल्लेखोर उठले व त्यांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला. देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला चढवला. त्यांच्यातील एकाने संदीप देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्प मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने देशपांडे यांनी हातमध्ये केल्याने तो फटका हातावर बसला. एकाने एक फटका त्यांच्या पायावर मारला. हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूचे लोक संदीप देशपांडे यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

 

 

त्यानंतर संदीप देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. (MNS Sandeep Deshpande)

 

गेले काही दिवस देशपांडे हे मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation (BMC) घोटाळे बाहेर
काढत असल्यामुळेच त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यामुळे याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- MNS Sandeep Deshpande | Attack on MNS leader Sandeep Deshpande in Shivaji Park; Beaten by Rod and Stump

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | लॉजमधील वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 4 मुलींची सुटका

Nashik ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना सहाय्यक निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Salman Khan | ‘किसी का भाई किसी की जान’मधील नवीन गाणे रिलीज; गाण्यामुळे नेटकऱ्यांनी केले सलमान खानला ट्रोल

Pune Chinchwad Bypoll Election | बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता, निकालानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया

 

The post MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article