Header

Solapur Crime News | रस्त्याच्या कडेला थांबणं बेतले जीवावर; टँकरखाली चिरडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

Solapur Crime News | रस्त्याच्या कडेला थांबणं बेतले जीवावर; टँकरखाली चिरडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

सोलापूर :  बहुजननामा ऑनलाईन  Solapur Crime News | सोलापूरमध्ये रस्त्याच्या कडेला थांबणे एका वृद्ध शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे. आनंदा विश्वनाथ गरड (वय 67 वर्ष, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मळी वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताप्रकरणी मळी टँकर चालकाच्या विरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
मृत आनंदा विश्वनाथ गरड हे रानमसले-बीबीदारफळ रोडवर रस्त्याच्या कडेला थांबले होते. यादरम्यान पाठीमागून येऊन टँकर चालकाने आनंदा गरड यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाले. यानंतर गावकऱ्यांनी वृद्ध शेतकऱ्यास जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले मात्र त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत आनंदा गरड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या प्रकरणी शुभम दयानंद गरड (वय 28 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून आरोपी अंकुश अर्जुन सेनमारे (वय 34 वर्ष, रा. नरखेड, ता. मोहोळ) या टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस दलातील सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Web Title :- Solapur Crime News | today solapur old farmer dies after dumper truck crushes

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट

Devendra Fadnavis | राहुल कलाटे यांना उभे करण्यामागे राष्ट्रवादीची स्ट्रॅटजी, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कलाटेंना उभं करण्यामागचं गणित (व्हिडिओ)

Pune Crime News | करार करुनही फ्लॅट खरेदी करुन देण्यास नकार देऊन वीज मीटर नेले कापून; मुंढव्यातील घटना

ACB Trap On Executive Engineer Mahesh Patil | 43 लाखांची लाच मागणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता साडेतीन लाख घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

The post Solapur Crime News | रस्त्याच्या कडेला थांबणं बेतले जीवावर; टँकरखाली चिरडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article