Header

Parbhani Crime News | तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे म्हणत आरोपींकडून मुलीचा विनयभंग

Parbhani Crime News | तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे म्हणत आरोपींकडून मुलीचा विनयभंग

परभणी : बहुजननामा ऑनलाईन  Parbhani Crime News | तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे असे म्हणत अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन जात दोन अल्पवयीन मुलांनी तिचा विनयभंग (Molestation) केला आहे. पीडित मुलीबरोबर जबरदस्तीने फोटो काढत तसेच तुझ्या मैत्रिणी सोबत आमची सेटिंग लावून दे असे हे आरोपी पीडित मुलीला म्हणाले. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी थेट गंगाखेड पोलीस स्टेशन (Gangakhed Police Station) गाठत दोन अल्पवयीन मुलावर गुन्हा (FIR) दाखल केला. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. (Parbhani Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?

गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे जात होती. यादरम्यान गावातीलच दोन मुले तिच्याजवळ आले आणि त्यांनी तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे तू आमच्या सोबत चल असे म्हणून मुलीला घेऊन गेले. यानंतर हि मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर गेली. यानंतर या आरोपी मुलांनी तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे, असे म्हणत मुली सोबत बळजबरीने फोटो काढला. (Parbhani Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या सगळ्या प्रकारानंतर पीडित मुलगी खूप घाबरली. यानंतर तिने घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार आपल्या आजीला सांगितला. यानंतर आजीने ऊस तोडी साठी गेलेल्या आपल्या मुलाला मुली सोबत गावातील दोन मुलांनी असा प्रकार केला असल्याची माहिती दिली. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी ऊस तोडीच्या ठिकाणावरून गंगाखेड पोलीस ठाणे गाठून दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

 

Web Title :  Parbhani Crime News | minor girl molested by two boys in parbhani

 

हे देखील वाचा :

Maharashtra Budget 2023 | शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष, अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Ghe Bharari | महिलांना सक्षम बनवणारे ‘घे भरारी’चे व्यासपीठ ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात महिला उद्योजकांची भावना

Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान

 

The post Parbhani Crime News | तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे म्हणत आरोपींकडून मुलीचा विनयभंग appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article