Header

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | स्वारगेट भागात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार सचिन परशुराम माने याच्यासह 13 साथीदारांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का (MCOCA) Mokka कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 16 टोळ्यांवर (Pune Crime News) कारवाई केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

टोळीप्रमुख सचिन परशूराम माने (वय-24 रा. औद्योगीक वसाहत, गुलटेकडी), टोळी सदस्य निखिल राकेश पेटकर (वय-22 रा. आईमाता मंदिर, बिबवेवाडी), रोहीत मधुकर जाधव (वय-27 रा. गुलटेकडी), अजय प्रमोद डेखळे (वय-24 रा. संत नामदेव शाळे जवळ, गुलटेकडी), यश किसन माने (वय-18 रा. गुलटेकडी), अमर तानाजी जाधव (वय-32 रा. गुलटेकडी), विजय प्रमोद डिखळे (वय-18 रा. समाज मंदिराजवळ, गुलटेकडी), मोन्या उर्फ सुरज सतिष काकडे (वय-26 रा. गुलटेकडी) हे आरोपी अटकेत असून त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर मोक्का कारवाई करण्यात आली असून पोलीस 4 जणांचा शोध घेत आहेत. (Pune Crime News)

 

आरोपींनी स्वारगेट परिसरात दरोडा (Robber), जबरी चोरी, खंडणी (Extortion), हप्ता गोळा करणे, टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्याच्या हेतूने खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), मारामारी, घातक शस्त्र बळगणे, मुलींची छेड काढणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. आरोपींवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) आयपीसी 307, 324, 326, 143, 147, 148, 149, 427, 108, 506 सह आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior Police Inspector Ashok Indalkar) यांनी तयार करुन पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे सादर केला. अपर पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर सचिन माने आणि 13 साथीदारांवर मोक्का कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. पुढील तपास सहायक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव (Police Inspector Somnath Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे (API Prashant Sande), पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले
(PSI Ashok Yewle), पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर (PSI Pramod Kalamkar),
पोलीस अंमलदार विजय खोमणे, सुनिता आंधळे तारु, चव्हाण, पवार, खेंदाड, शेख, कांबळे, गायकवाड, गोडसे,
शेख, घुले यांच्या पथकाने केली.

 

 

आयुक्तांची 16 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या
व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात 16 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Pune’s notorious gangster Sachin Mane and his 13 accomplices booked under MCOCA ‘Mokka’, Police Commissioner Retesh Kumaarr’s 16th action

 

हे देखील वाचा :

Pune Police – PSI Suspended | आरोपीकडून 50 हजार रुपये घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे तडाफडकी निलंबन

Pune Crime News | ‘लव जिहाद’चा खटला असल्याचा युक्तीवाद ! बलात्कार व खंडणी प्रकरणी उच्च शिक्षित तरुणाला 7 वर्षाची सक्तमजुरी

 

The post Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article