Header

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | बनावट मॅरेज सर्टिफिकेट (Fake Marriage Certificate) तयार करुन ३० लाख रुपयांची खंडणीची (Ransom) मागणी एका राजकीय नेत्याच्या मुलाकडे केली. पैसे दिले नाही तर बलात्काराचा (Rape Case) गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५५/२३) दिली आहे.
हा प्रकार ७ फेब्रुवारीपासून सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर ७ फेब्रुवारी रोजी एका मोबाईलवरुन एका मुस्लिम मुलीसोबत विवाह झाल्याबाबतचे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ता. सोयगावमधील वडगाव (ती) चे ग्रामसेवकाचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठविले. “हमने आप के नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है, खराडी इऑन आय टी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना. आपने नही दिया तो आपपर रेप केस कर दुंगी” असा धमकीचा मेसेज आला. त्याकडे फिर्यादीने दुर्लक्ष केले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी त्यांना या तरुणीच्या नावाने मेसेज आला. (Pune Crime News)

 

“तूने ३० लाख रुपये नही दिए तो तुझे रेप के केस मे अंदर कर दुंगी खराडी इऑन आय टी पार्क के सामने
डर्क लाईन प्लॉट के अंदर इनोव्हा मे ३० लाख रुपये रख देना. पैसे नही रखे तो मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल कर दुंगी,
असा धमकीचा मेसेज आला. त्यानंतर ५ मार्च रोजी व्हॉटसअ‍ॅप वर “दे रहा क्या पैसा नही तो मार दुंगी,
तेरी पुरी सेटिंग हुई है बहुत जल्द मार देंगे तेरे को गोली मार के जायेंगे तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए,
“असा मेसेज करुन ३० लाख रुपये देण्याची धमकी दिली. गोळी मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी पोलिसांकडे
धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक पुराणिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Exciting! Threat to shoot son of political leader in Pune; A ransom of 30 lakhs was demanded

 

हे देखील वाचा :

PMPML Strike | पीएमपीएमएलची सेवा पूर्ववत करावी, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Nashik ACB Trap | 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

The post Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article