Header

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

 

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | आरटीओमध्ये (Pune RTO) छोटे जरी काम करायचे असेल तर एजंटाशिवाय होत नाही. जर एजंटाशिवाय गेले तर त्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात, असा सर्वसामान्यांना नेहमी अनुभव येत असतो. पण, एजंटाच्या भरवश्यावर सुरु असलेला कारभारामुळे आता एजंटच शिरजोर झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. एका एजंटने (RTO Agent) गाडीचे कागदपत्र आरटीओ निरीक्षकाच्या (RTO Inspector) अंगावर फेकून मारहाण (Beating) करुन जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड Abhijit Gaikwad (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८२/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निकी फ्रान्सीस स्वामीनाथन (वय ३८, रा. आदर्श इंदिरानगर, आळंदी रोड, फुलेनगर) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार फुलेनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (Regional Transport Office (RTO) शुक्रवारी दुपारी १ ते ३ यावेळेत घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात शासकीय कर्तव्यावर असताना
खाजगी एजंट स्वामीनाथन हा त्यांच्या कार्यालयात आला. फिर्यादी यांच्या अंगावर गाडीचे पेपर फेकले. ‘‘ए गायकवाड, हया पेपरवर सही करुन दे,’’ असे बोलून शिवीगाळ केली. तसेच ‘‘गायकवाड सही कर नाही तर मी तुला तुझ्या पत्त्यावर येऊन जीवे मारुन टाकील,’’असे बोलून फिर्यादीची गंचाडी पकडून मारहाण केली. अँटी करप्शनमध्ये अडकविण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या सहकार्‍यांना ‘‘आताचे आता रजिस्टरला नोंद कर, नाही तर मी तुला बघुन घेईल, ’’अशी धमकी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

 

 

Web Title :Pune Crime News | Agent beating RTO inspector to sign document; Type in RTO office in Phulenagar

 

हे देखील वाचा :

Youth Congress-Pune | शेतकरी, युवकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस 20 मार्चला घालणार विधिमंडळाला घेराव; युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती

Gravittus Foundation | सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई आढाव यांना ग्रॅव्हिटस फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

PMRDA – Property Cards | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच संपूर्ण करणार – शंभुराज देसाई

 

The post Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article