Pune Crime News | दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; वडिल, आजीविरोधात गुन्हा दाखल
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पत्नीच्या निधनानंतर दुसरे लग्न करण्याचा त्यांचा विचार आहे. मात्र, त्याला त्यांच्या १३ वर्षाच्या मुलीने विरोध केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी कर्वेनगरमधील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे वडिल व आजीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिलांना दुसरे लग्न करायचे होते.
परंतु फिर्यादी यांचा त्यास विरोध आहे.
त्या रागातून फिर्यादीस विनाकारण शिवीगाळ करुन तसेच फिर्यादी घरात वावरत असताना फिर्यादीच्या अंगाला
स्पर्श करुन त्यांच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून विनयभंग केला.
तसेच फिर्यादीचे बहिणीसोबत ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीची आजी विनाकारण फिर्यादी तिला मारहाण करते म्हणून फिर्यादीची बदनामी करण्याचा प्रयत्न करते,
असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Father molested 13-year-old daughter for resisting remarriage; A case has been filed against father and grandmother
हे देखील वाचा :
The post Pune Crime News | दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; वडिल, आजीविरोधात गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.