Header

Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीचे सीम कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करून कंपनीला 21 लाखांचा गंडा; चिंचवड MIDC मधील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीचे सीम कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करून कंपनीला 21 लाखांचा गंडा; चिंचवड MIDC मधील प्रकार

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीच्या नावावर असलेले सिम कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट (SIM Card Deactivate) करुन ते सिम कर्ड कनेक्ट असलेल्या बँक खात्यातून परस्पर 21 लाख रुपये ट्रान्स्फर करुन घेत कंपनीची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 25 सप्टेंबर 2022 ते 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत चिंचवड एमआयडीसीमध्ये असलेल्या परफेक्ट लॅबोरेटरी सर्विसेस कंपनीत (Perfect Laboratory Services Company) घडला आहे.

 

याबाबत आनंद दिगंबर शुक्रे Anand Digambar Shukre (वय-42 रा. पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) खात्याचा धारक असलेल्या मंताजुल इस्लाम मुल्ला (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीचा मोबाईल क्रमांक डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी कंपनीच्या नावाने आयडिया (Idea)-वोडाफोन (Vodafone) कंपनीला मेल पाठवला. त्यानंतर कंपनीचा मोबाईल क्रमांक कनेक्ट असलेल्या कॅनरा बँकेच्या (Canara Bank) खात्यातून 25 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 9 लाख रुपये आणि 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी सहा आणि साडेआठच्या सुमारास 12 लाख रुपये असे एकूण 21 लाख रुपये आरोपीने ऑनलाइन ट्रान्सफर करुन घेत कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | 21 lakhs to the company by deactivating the SIM card of the company; Type in Chinchwad MIDC

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Government | सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Ravindra Dhangekar | Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात बॅनरबाजी करत प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘मला वटतं शरद पवारांनी…’ शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा खोचक सल्ला (व्हिडिओ)

 

The post Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीचे सीम कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करून कंपनीला 21 लाखांचा गंडा; चिंचवड MIDC मधील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article