Header

Ravindra Dhangekar | Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात बॅनरबाजी करत प्रत्युत्तर

Ravindra Dhangekar | Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात बॅनरबाजी करत प्रत्युत्तर

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन  नुकत्याच पार पडलेल्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचा हा बालेकिल्ला मानला जात होता. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करून हि निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीवरून आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराच्या वेळी Who Is Dhangekar असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. हि निवडणूक जिंकल्यानंतर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थकांनी हाच धागा पकडून पुण्यामध्ये This is Dhangekar बॅनर लागले आहेत. त्यानंतर आता कोल्हापुरातही असे पोस्टर लावून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात आलं आहे. कोल्हापूर शहरातील कावळा नाका चौक परिसरात This is Dhangekar म्हणत महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडी सरकारने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. सर्व पक्षांचे मोठमोठे नेते याच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी प्रचारामध्ये सर्वसामान्य घरातील असलेल्या धंगेकर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर म्हणून हि बॅनरबाजी केली आहे. स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून घेतात आणि दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात, अशी टीकादेखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

 

या निवडणुकीसाठी भाजपने रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या निवडणुकीसाठी प्रचारात उतरले होते. या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भरसभेत हू इज धंगेकर, तो आमच्यासमोर टिकू शकत नाही अशी टीका केली होती.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेली कविता
Who is dhangekar?
ज्याने पाडला गणेश बिडकर,
केला गड सर,
Who is dhangekar?
ज्याने वाटायला लावले,
चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,
Who is dhangekar?
प्रचाराला लावले RSS चे केडर,
भले-भले मोठे बिल्डर,
Who is dhangekar?
देशाचे नेते फिरवले गल्लीभर,
धास्तीने जागेच रात्रभर,
Who is dhangekar?
ज्याने अश्रू आणले ओठांवर,
बंगल्याचे ओझे पेठांवर,
Who is dhangekar?
ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,
नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर,
Who is dhangekar?
जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,
नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,
Who is dhangekar?
घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,
ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.
कळले का?

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ravindra Dhangekar| this is dhangekar banner also in kolhapur after pune as bjp loss in kasaba bypoll election

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘मला वटतं शरद पवारांनी…’ शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा खोचक सल्ला (व्हिडिओ)

Washim Accident News | वाशिममध्ये मोठी दुर्घटना! ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षा पलटी होऊन दोघांचा मृत्यू

 

The post Ravindra Dhangekar | Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात बॅनरबाजी करत प्रत्युत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article