Header

Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

पुणे : बहुजननामा ऑनलाईन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात येणाऱ्या दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. याचा फटका विना तिकीट (Without Ticket) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच बसणार आहे. सुरुवातीला विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 300 रुपये दंड (Fine) वसुल केला (Pune PMPML News) जात होता. मात्र आता दंडाची रक्कम 500 रुपये करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत 300 रुपये ऐवजी 500 रुपये दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने (Board of Directors) मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या 10 मार्चपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Pune PMPML News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुण्यात पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वच जण पीएमपीएमएलने प्रवास करत असतात. मात्र यामध्ये काही प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करत असतात. त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापार्श्वभूमीवर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना आळा बसेल असा विश्वास महामंडळाला आहे. (Pune PMPML News)

 

‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास
येत्या 8 मार्च पासून तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना तेजस्विनी बसमधून मोफत प्रवासाची योजना सुरु केली होती.

 

3 मार्गावर 28 बसेस सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाकाळात ही योजना थांबवण्यात आली होती.
मात्र, आता ही योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परिस्थिती सुरळीत झाली आहे.

 

त्यामुळे येत्या 8 मार्च महिला दिनापासून ही योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करावा असे
आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune PMPML News | PMPML on without ticket passengers, huge increase in fine amount

 

हे देखील वाचा :

Former MLA Suryakant Desai Passed Away | रस्त्यात अ‍ॅम्ब्युलन्स बंद पडली, उपचाराअभावी सेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन

Chhatrapati Sambhaji Nagar Accident | एसटी आणि गॅस सिलेडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात, 10 जणांची प्रकृती चिंताजनक; टेम्पो चालकाचा मृत्यू

Pune Traffic Updates News | शिवाजीनगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

 

The post Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article