Header

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) मुंबईत सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज आरोपप्रत्यारोप होत आहेत. विधान सभेतील भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील सहकार क्षेत्रातील (Cooperation) घराणेशाही आता केंद्राच्या रडावर आली आहे. सहकार क्षेत्रातील मक्तेदारी आणि घराणेशाही मोडीत काढण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विधान सभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली भूमिका मांडताना विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातील घराणेशाही आणि मक्तेदारीबाबत भाष्य केलं. ते म्हणाले राज्यातील सहकार क्षेत्रात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) लक्ष ठेवून आहेत. सहकार क्षेत्रातील मातब्बर राजकिय घराणी, विशेष करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सहकारी संस्था, केंद्र सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. राज्यातील सहकार क्षेत्र बळकट करायचे असेल तर सहकार क्षेत्रातील घराणेशाही मोडीत काढली पाहिजे. तरच सर्व सामान्य शेतकरी आणि नागरिकांना सहकार क्षेत्राचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मी श्रेय घेत नाही, पण तुमच्यासारखं…
अगोदर एमपीएससी चा (MPSC) निर्णय झाला होता, मी त्यावेळी त्या सरकारमध्ये होतो.
पण त्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायची. मी निवडणूक आयोग (Election Commission) म्हणालो,
त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तेच म्हणत आहे,
लोकसेवा आयोग काय निवडणूक आयोग तेच लावलं आहे. पण आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्व आहे.
मी श्रेय घेत नाही, पण तुमच्यासारखं वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांच्या समाधीवर आत्मक्लेश करायला जाव लागलं नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला.

 

तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल
सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमची काम तुम्हाला दिसत नाहीत.
दिसत असली तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं विरोधकांचे काम आहे.
तुमचं मोती बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | nepotism in cooperative sector in ncp party on radar a clear signal from the chief minister eknath shinde

 

हे देखील वाचा :

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल

Ayan Mukerji | ‘ब्रह्मास्त्र 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ; दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी हिंट

Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

 

The post CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article