Header

Abdul Sattar | महाराष्ट्राच्या ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी सुचवलं ‘या’ भाजप नेत्याचं नाव

Abdul Sattar | महाराष्ट्राच्या ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी सुचवलं ‘या’ भाजप नेत्याचं नाव

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना ‘भावी मुख्यमंत्री’ कोण? अशी चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) व्हावं का? असा प्रश्न अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, आपला मित्र मोठा व्हावा असं कुणाला वाटत नाही, विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षाही मोठ व्हावं, असं सत्तार यांनी म्हटलं. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आलं. तर भावी मुख्यमंत्र्याच्या नावाच्या यादीत आता आणखी एका नावाची चर्चा पुढे आली आहे.

 

 

मी हनुमान असतो तर…

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, मी हनुमान असतो तर छाती फाडून दाखवलं असतं की माझ्या हृदयात विखे पाटील आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला असता सत्तार म्हणाले, आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांनी विखे पाटलांना महसूल खातं दिले आहे. विखे पाटील त्यात (Maharashtra Political News) चागलं काम करत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मी हे नवे बदल पाहतोय

सत्तार पुढे म्हणाले, महसूल खात्याची महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. या विभागात अत्याधुनिक बदल होत आहेत. मी इतक्या दिवसांपासून राजकारणात आहे. मी हे नवे बदल पाहतोय. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले, कोणाला वाटणार नाही आपला मित्र काहीतरी व्हावा. मी तर म्हणतो मुख्यमंत्री पदापेक्षा त्यांनी पुढे जावं. तसेच ते अडचणीत येतील असे कोणतेही प्रश्न विचारु नका, असे ही सत्तार म्हणाले.

 

 

Web Title :- Abdul Sattar | abdul sattar says radhakrishna vikhe patil should rise high beyond cm post

 

हे देखील वाचा :

Pune RPO News | पुणे : येत्या शनिवारी पासपोर्ट मेळावा

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Mumbai Police Crime News – WPSI Death | महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने प्रचंड खळबळ

Mundhwa Jackwell -Kharadi STP | मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारणार

 

The post Abdul Sattar | महाराष्ट्राच्या ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी सुचवलं ‘या’ भाजप नेत्याचं नाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article