Header

Pune RPO News | पुणे : येत्या शनिवारी पासपोर्ट मेळावा

Pune RPO News | पुणे : येत्या शनिवारी पासपोर्ट मेळावा

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन Pune RPO News | अलिकडच्या काळातील पासपोर्टची वाढती मागणी लक्षात घेवुन पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाने (Pune Regional Passport Office) येत्या शनिवारी म्हणजेच दि. 29 एप्रिल रोजी पासपोर्ट कार्यालये आणि पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पासपोर्ट मेळावा आयोजित केला आहे. (Pune RPO News)

 

सदरील पासपोर्ट मेळाव्यामध्ये सामान्य म्हणजेच नॉर्मल पासपोर्ट काढणारे तसेच तात्काळ (अर्जंट) पासपोर्ट (Tatkal Passport) काढणार्‍या या दोन्ही श्रेणीतील अर्जदारांना मेळाव्यासाठी अपॉइंटमेंट घेता येईल. यापुर्वीच पासपोर्टसाठी अर्ज भरल्याने पुढच्या तारखेची अपॉइंटमेंट मिळालेले अर्जदार देखील मेळाव्यासाठी त्यांची तारीख ही रिशेड्यूल करू शकतील. पण, तारीख बदलण्याची ही संधी त्यांना केवळ एकदाच मिळणार आहे. (Pune RPO News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अर्जदार हे जर दिलेल्या वेळेमध्ये अनुपस्थित राहिले तर त्यांना नवीन तारीख मिळणार नाही. अनुपस्थित राहणार्‍या अर्जदारांचे अर्जाची फीस ही जप्त होऊ शकते अशी माहिती पुणे पासपोर्ट विभागातर्फे देण्यात आलेली आहे. पासपोर्ट मेळाव्यासाठी विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट उपलब्ध झालेल्या आहेत. नवीन अपॉइंटमेंट घेण्याची इच्छा असणार्‍यांनी https://www.passportindia.gov.in येथे ऑनलाइन फॉर्म भरावा आणि फीस भरावी. त्यानंतर अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी याच वेबसाईटवर पुन्हा लॉग इन करावे आणि ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरच वेबसाईटवर अपॉइंटमेंटचे कन्फर्मेशन दिसणार आहे.

 

 

Web Title :-  Pune RPO News | Passport Mela On Coming Saturday In pune

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Mumbai Police Crime News – WPSI Death | महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने प्रचंड खळबळ

 

The post Pune RPO News | पुणे : येत्या शनिवारी पासपोर्ट मेळावा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article