Header

ACB Trap News | मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेणारा डॉक्टर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेणारा डॉक्टर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन  ACB Trap News | शस्त्र परवान्यासाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट (Medical Certificate For Arms License) देण्यासाठी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Ratnagiri Bribe Case) करून तडजोडीअंती 18 हजार रूपयाची लाच घेणार्‍या डॉक्टर सुरेश दत्तात्रय कुराडेला (Dr. Suresh Dattatraya Kurade) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (ACB Trap News)

 

डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे (वैद्यकीय अधिकारी, उप जिल्हा रूग्णालय, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे (Ratnagiri ACB Trap). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या वडिलांच्या शस्त्र परवान्याचे नुतनिकरण करावयाचे होते. त्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांची वैद्यकीय तपासणी होऊन त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. सदरील वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. सुरेश कुराडे यांनी तक्रारदाराकडे सुरूवातीला 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली (Ratnagiri Crime News). तडजोडीअंती 18 हजार रूपयाची लाच घेण्याचे ठरले. (ACB Trap News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. गुरूवारी (दि. 27 एप्रिल) सरकारी पंचासमक्ष डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांनी तक्रारदार यांच्याकडून 18 हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

 

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (Thane ACB SP Sunil Lokhande), अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुशांत चव्हाण (DySP Sushant Chavan), पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे (PI Pravin Tate), पोलिस हवालदार विशाल नलावडे, पोलिस नाईक दीपक आंबेकर आणि चालक पोलिस नाईक प्रशांत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- ACB Trap News | A doctor who took a bribe of 18 thousand to give a Medical Certificate For Arms License is in the net of anti-corruption

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला

Pune Pimpri Chinchwad Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) | आयपीईव्ही च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले भारतीय हवाई दलातील करिअर विषयक मार्गदर्शन

 

The post ACB Trap News | मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेणारा डॉक्टर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article