Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणार्‍या डॉक्टराला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणार्‍या डॉक्टराला अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मोबाईलवर संपर्क साधून मेसेज व कॉल करुन त्याने जवळीक निर्माण केली. माफी मागण्यासाठी क्लिनिकला बोलावून घेतले. महिलेने इंजेक्शन घेण्यासाठी कंबरेवरील कपडे खाली केले असताना तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करणार्‍या डॉक्टरला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

डॉ. अमित आनंदराव दबडे Dr. Amit Anandrao Dabde (वय २९, रा. सह्याद्री सोसायटी, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) असे या डॉक्टरचे नाव आहे. हा प्रकार कात्रज मांगडेवाडी (Mangdewadi, Katraj) येथील कल्पनानंद क्लिनिकमध्ये (Kalpanand Clinic) १ जुलै २०२२ पासून आजपर्यंत घडला आहे.

 

याबाबत एका ३२ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५९/२३) दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. अमित दबडे याने फिर्यादी सोबत मोबाईलवर मेसेज आणि कॉल करुन जवळीक साधली. गोड गोड बोलून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून फिर्यादीशी शारीरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याला फिर्यादीने विरोध केल्यावर या प्रकाराबाबत माफी मागण्याचा बहाणा करुन फिर्यादी यांना क्लिनिकमध्ये बोलावले. फिर्यादी या एके दिवशी इंजेक्शन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी कंबरेवरील कपडे खाली केले असताना डॉक्टराने त्यांच्यावर क्लिनिकमध्येच बलात्कार केला. त्यानंतरही त्यांची इच्छा नसताना त्यांचा वारंवार पाठलाग केला. त्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्यादी दिली. सहायक पोलीस निरीक्षक तावडे (Assistant Police Inspector Tawde) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station – Doctor arrested for raping woman who came for treatment

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘भाकरी फिरवण्याचा अर्थ अजित पवारांना दूर केलं पाहिजे’, शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची प्रतिक्रिया

Maharashtra Sadan – Sudan Crisis | महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

Jayant Patil | ‘नंबर आल्यावर एकमताने…’, अमोल कोल्हेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर जयंत पाटलांनी सांगितली ‘मन की बात’

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नामंतर ‘राजगड’ करावं, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणार्‍या डॉक्टराला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article