Header

Ajit Pawar | ‘आमचं वकीलपत्र घेऊ नका’, अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारलं

Ajit Pawar | ‘आमचं वकीलपत्र घेऊ नका’, अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारलं

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  – अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. राष्ट्रवादीचा (NCP) मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाचं (Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामनातूनही यासंदर्भात भाष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना सुनावलं आहे. आमचं वकीलपत्र घेण्याचं कुणी कारण नाही, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी अशा शब्दात अजित पवारांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) फटकारलं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आम्ही सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत. पक्षातच राहणार आहोत, त्यात कोणताही आधार नाही. इतर राजकीय पक्षाचे लोक याबद्दल स्वत:ची मतं व्यक्त करत आहेत. त्यांनी खुशाल करावीत. त्यांना तो हक्क आहे. आज मी माझ्या कार्यालयात बसतो, त्यावेळी आमदारांच्या (NCP MLA) बैठका असतात, मंत्रालयात आलेले आमदार मला भेटायला आले. त्याचा वेगळा अर्थ काढू नका.

 

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले, माझ्याबद्दलच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं जात आहे. एवढं का प्रेम ऊतू चाललं आहे? माझ्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम विघ्नसंतोषी लोक करत आहेत. माझ्या पक्षातले लोक नाही, पण पक्षा बाहेरचे लोक करत आहेत.

 

इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, इतर पक्षांचे प्रवक्ते सुद्धा (Spokesperson) राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar on mp sanjay raut statemets about ncp

 

हे देखील वाचा :

Ali Daruwala | अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती

Ajit Pawar | कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज, सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका, अजित पवारांनी केली विनंती

Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

 

The post Ajit Pawar | ‘आमचं वकीलपत्र घेऊ नका’, अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारलं appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article