Bharati Vidyapeeth’s New Law College | आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे यश
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Bharati Vidyapeeth’s New Law College | भारती अभिमत विद्यापीठ मधील न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थी संघांनी हाँगकाँग आणि व्हीएन्ना येथील विल्यम सी.व्हीस इंटरनॅशनल कमर्शिअल आर्बिट्रेशन मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊन यश मिळवले . हॉंगकॉंगच्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे लेखी प्रमाणपत्र मिळवले. व्हिएन्ना येथील मुट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये सहभागी संघाने ४०० संघांपैकी पहिल्या ७० संघांमध्ये स्थान मिळवले. (Bharati Vidyapeeth’s New Law College)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ .उज्वला बेंडाळे ,सहाय्यक प्राध्यापक शिवांगी सिन्हा तसेच कॉलेजच्या ए डी आर सेल (विभाग) ने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हॉंगकॉंग येथील स्पर्धेमध्ये आर्यन प्रताप ,भाव्या नारायण, कुशाग्र शर्मा, सेफाली झा, सृष्टी चौधरी, रिद्धीमा सिन्हा, उत्कर्ष ,नमन श्रीवास्तव यांनी सहभाग घेतला. व्हिएन्ना येथील स्पर्धेमध्ये अरिजीत संन्याल, आशी जैन, कृतज्ञ अग्रवाल, उष्मा जैन ,अनिशा आर्य, संभावि शिवानी यांनी भाग घेतला. (Bharati Vidyapeeth’s New Law College)
Web Title :- Bharati Vidyapeeth’s New Law College | Bharati Vidyapeeth’s New Law College Excelles in International Moot Court Competitions
हे देखील वाचा :
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा
The post Bharati Vidyapeeth’s New Law College | आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे यश appeared first on बहुजननामा.