Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिस चौकीत आणल्यानंतर नशेत धुंद असलेल्या आरोपीने डायरेक्टपोलिसाची कॉलरच पकडली. तुला दाखवतो, माझी खूप मोठी ओळख आहे असे म्हणून त्यानं पोलिस अंमलदाराच्या शर्टाचे बटणच तोडले. सदरील घटना बावधन पोलिस चौकीमध्ये (Bavdhan Police Chowki) घडली.
याप्रकरणी अमर आबासाहेब दुबल Amar Aabasaheb Dubal (30) आणि गोरख नामदेव गाजरे Gorakh Namdev Gajare (26, रा. वडगाव बुद्रुक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस अंमलदार उदयराज दिपक माने Police Udayraj Deepak Mane (32) यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये (Hinjawadi Police Station) फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री उशिरा पोलिस अंमलदार माने हे हिंजवडी पोलिस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या कॉलच्या पूर्ततेसाठी मार्शलसह सुतारवाडी परिसरात गेले होते. त्यांनी कॉल करणारे आणि विरोधक यांना बावधन पोलिस चौकीत तक्रार नोंदविण्यासाठी नेले. त्यावेळी अमर दुबल आणि गोरख गाजरे यांनी नशा केली होती. गोरख हा पोलिस अंमलदार माने यांच्या अंगावर धावुन गेला. त्याने धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा (Disruption Of Government Work) आणला. आरोपीने पोलिसाची कॉलर ओढून त्यांच्या शर्टाचे बटण आणि नेमप्लेट (Police Nameplate) तोडले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | FIR On Amar Aabasaheb Dubal And Gorakh Namdev Gajare Regarding Disruption Of Government Work
हे देखील वाचा :
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर appeared first on बहुजननामा.