Header

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित
पवार (Ajit Pawar) भाजपासोबत (BJP) जाणार असल्याचं ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या (NCP Chief
Sharad Pawar) प्रतिक्रिया येत आहेत. दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान,
यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी
प्रश्न विचारला. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उत्तर देणं टाळलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, अंजली दमानिया यांच्या प्रश्नांवर मी उत्तर द्यायला लागलो तर कसं व्हायचं. त्या ट्वीट बद्दल तुम्ही दमानियांना विचारलं पाहिजे. त्यांना तुम्ही विचारा की, सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) त्यांना काही निरोप आला आहे का. मुळात सुप्रीम कोर्टाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

 

 

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज मंत्रालयात (Mumbai Mantralaya) कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहे… तेही लवकरच. त्या पुढे लिहितात, महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि तेही लवकरच असंट ट्विट अंजली दमानिया यांनी केलं होतं. या दाव्यावर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे,
असे म्हणत अजित पवार यांनी दमानिया यांच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar says cannot say anything about anjali damania tweet abut ajit pawar

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली? शरद पवारांनी केला खुलासा

Pune Crime News | भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी एस.एन. सिस्टम प्रा.लि. कंपनीचा डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी विरूध्द गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

 

The post Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article