Ajit Pawar | अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) लवकरच भाजपाबरोबर (BJP) जाणार असल्याचा दावा केला आहे. अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आले आहे. दमानिया यांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यात पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि तेही लवकरच असंट ट्विट अंजली दमानिया यांनी केलं होतं. या दाव्यावर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे, असे म्हणत अजित पवार यांनी दमानिया यांच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज मंत्रालयात (Mumbai Mantralaya) कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहे… तेही लवकरच. त्या पुढे लिहितात, महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar comment on anjali damania claim about going with bjp
हे देखील वाचा :
Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार
The post Ajit Pawar | अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले… appeared first on बहुजननामा.