Header

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Dr. Nivedita Bhide | विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित, डॉ. प्रकाश बोकील (Dr. Prakash Bokil) लिखित ‘गोष्टी,गोष्टी,पन्नास गोष्टी !’ या ५ पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन रविवार,दि २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाले. विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री डॉ निवेदिता भिडे (Dr. Nivedita Bhide) यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ झाला. विमलाबाई गरवारे प्रशाला Vimalabai Garware High School (डेक्कन कॉर्नर) येथे हा कार्यक्रम झाला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर , नितीन कीर्तने यावेळी उपस्थित होते. जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ५० प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी या पुस्तक संचात एकत्र करण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवसात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी हे गोष्टींचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.वाचनातून मूल्य शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे.

 

डॉ.निवेदिता भिडे (Dr. Nivedita Bhide) म्हणाल्या, ‘मुलांच्या भाव जागरणासाठी गोष्टी उपयुक्त असतात. स्वभावाला समजून जीवनाला दिशा देण्यासाठी हे माध्यम वापरावे.हे गोष्टी सांगणं, कमी होऊ नये. गोष्टी फुलवण्याची कला कमी होऊ नये. घरातील सर्वांनी कला शिकून घ्यावी. त्यासाठी वाचन वाढवावी. चांगल्या गृहस्थाश्रमासाठी हे होणे आवश्यक आहे. ‘ कोणत्याही वयोगटात गोष्टी आकर्षून घेतात. भारतात गोष्टी मोठया प्रमाणात सांगितल्या जातात. महान व्यक्तीमत्वांवर गोष्टी , किस्से, कहाण्या तयार होतात. त्या परत परत सांगीतल्या जातात. त्यातून काय संदेश घ्यायचा हे मुलांना कळत असते ‘, असेही त्यांनी सांगीतले.

 

प्रकाश बोकील म्हणाले, ‘सद्वर्तनाच्या प्रवासाचा प्रारंभ या पुस्तक वाचनातून होते. चांगल्या वागण्याची प्रेरणा होणार आहे. संवेदनशीलता वाढण्यास मदत होणार आहे. उपदेशाचे डोस न पाजता हसत खेळत मूल्य संवर्धनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले. वसुधा करंदीकर, वैदेही गोडबोले, सुमीत शिवहरे, हार्दिक मेहता, विश्वास लापालकर, श्रीकांत काशीकर ,विवेक गिरीधरीकर, अंजली भडाळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दीपक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

युवक अभिवाचन एकत्रीकरण उत्साहात

या प्रकाशन समारंभा आधी ३ ते ५ या वेळेत डॉ. निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत युवकांसाठी अभिवाचन एकत्रीकरण समारंभ उत्साहात पार पडला. विवेकानंद केंद्र ची १६ ऑडिओ बुक, यु ट्यूब वाहिनी या विषयी माहिती देण्यात आली. ‘शब्द अमृताचे’ या अभिवाचन उपक्रमाचा शंभरावा भागाच्या निमित्ताने अभिवाचक,लेखक,मुलाखतकार यांचे एकत्रीकरण झाले.याबाबत युवकांनी मनोगते सादर केली.
डॉ निवेदिता भिडे यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी सुधीर जोगळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सई रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

Web Title :- Dr. Nivedita Bhide ‘Things, things, fifty things!’ Publication of book set – Things should awaken feelings, get direction: Dr. Nivedita Bhide

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘मविआत शक्य नाही, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे’, केंद्रीय मंत्र्याची ऑफर

Pune University – SPPU News | अश्लील रॅप साँग शूट केल्याचा अभाविपचा आरोप, पुणे विद्यापीठात तोडफोड (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे-लोहगाव क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – महिलेचा हात पिरगाळुन गाऊन फाडला, अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा

Sahil Pandurang Margaje | धनकवडी : जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत साहिल मरगजेची नेत्रदीपक कामगिरी; वरिष्ठ गटात पटकावली 7 पदके

 

The post Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article