Pune Crime News | पुणे-लोहगाव क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – महिलेचा हात पिरगाळुन गाऊन फाडला, अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी दोघांविरूध्द विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Crime Against Woman) . ही घटना रविवारी लोहगावमधील (Lohegaon) पठारे वस्ती (Pathare Vasti) परिसरात घडली आहे. (Pune Crime News)
मयुर सोनापंत पाटील Mayur Sonapant Patil (32) आणि आरबाज दौलत तांबोळी Arbaaz Daulat Tamboli (19)
अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असुन त्यानुसार आरोपींविरूध्द भादंवि 452, 354, 509, 323, 504, 606, 327 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, रविवारी (दि. 23) फिर्यादी या राहत्या घरी असताना आरोपींनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. पिडीत महिलेच्या एका नातेवाईकाने घेतलेल्या दीड कोटी रूपयांच्या कारणावरून त्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घरातील वस्तुंची तोडफोड करून नुकसान केले. आरोपीने महिलेचा हात पिरगाळुन त्यांचा गाऊन फाडला आणि अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मयुर सोनापंत पाटील आणि आरबाज दौलत तांबोळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साळवी (PSI Salvi) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Lohgaon – Vimannagar Police Station – A woman’s hand was torn off her gown, a case against two for indecent abuse
हे देखील वाचा :
Gulabrao Patil | ‘राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही’, गुलाबराव पाटलांची सडकून टीका
The post Pune Crime News | पुणे-लोहगाव क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – महिलेचा हात पिरगाळुन गाऊन फाडला, अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा appeared first on बहुजननामा.