Header

Maharashtra Politics News | ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना काका आणि आकांना विचारलं का?’, भाजपचा अजित पवारांना सवाल

Maharashtra Politics News | ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना काका आणि आकांना विचारलं का?’, भाजपचा अजित पवारांना सवाल

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Maharashtra Politics News | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा (MVA Vajramuth Sabha) रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेत ठाकरे गट (Thackeray Group), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी भाजप (BJP), केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि राज्यातील शिंदे सरकारवर (Shinde Government) जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी अनेक मुद्यांवरून भाजपवर (Maharashtra Politics News) टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना त्यांनी सावरकरांना भारतरत्न (Bharat Ratna) द्या, तुमच्यात हिंमत आहे का? अशी विचारणा त्यांनी केली होती. अजित पवारांच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले अजित पवार?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजप व शिंदे गटाने ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. या यात्रेवरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule) यांचा अपमान केला. त्यावेळी दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फक्त व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार (Maharashtra Politics News) आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

 

 

अजितदादांनी काकांना विचारलं का?

अजित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हे अजित पवारांनी काकांना का विचारले नाही? स्वत:चे काका 15 वर्ष मंत्री आणि मुख्यमंत्री होते.
काका नाहीतर ज्यांच्याबरोबर राहिले ते आका सुद्धा होते. काका आणि आकांना का प्रश्न विचारला नाही,
याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे. माग आम्हाला प्रश्न विचारावा, असा पलटवार शेलार यांनी केला आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | bjp leader ashish shelar replied ncp ajit pawar over to give veer savarkar bharat ratna criticism

 

हे देखील वाचा :

Bhaurao Karhade’s ‘TDM’ | तुमच्या-आमच्यातल्या भाऊरावांचा महात्त्वाकांक्षी”टीडीएम”येतोय..

Pune Crime News | बिबवेवाडी : पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेला लुटले; पावणेचार लाखांचे दागिने पळविले

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

 

The post Maharashtra Politics News | ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना काका आणि आकांना विचारलं का?’, भाजपचा अजित पवारांना सवाल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article