Header

Maharashtra Politics News | ‘शिंदे सरकारचं भाजपला ओझं झालं’, राऊतांच्या टीकेला भाजप आमदारांचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics News | ‘शिंदे सरकारचं भाजपला ओझं झालं’, राऊतांच्या टीकेला भाजप आमदारांचं प्रत्युत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  Maharashtra Politics News | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे सरकारवर (Eknath Shinde Government) निशाणा साधला आहे. एक नक्कीच आहे की महारष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला सध्याच्या सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं खांद्यावर हा प्रश्न निर्माण झाल्याची (Maharashtra Politics News) चर्चा मी ऐकतो आहे. अर्थात तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे, असा टोला राऊतांनी लगावला होता. राऊतांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नितेश राणे म्हणाले, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचं ओझं भाजपला झालं आहे असं राऊत (Maharashtra Politics News) म्हणाले, मी तर हेच म्हणेन की उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) ओझं महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) झालं आहे. माझ्या माहितीनुसार 1 मे रोजी होणारी सभा ही मविआची शेवटची वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha) असेल अशी माझी माहिती असल्याचे नितेश राणे म्हणाले.

 

 

 

राऊतांकडून खरगेंचे समर्थन

मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी मोदींना विषारी साप म्हटल्याचं मी ऐकलं.
पण ते नेमकं काय म्हटले हे मला माहिती नाही. मात्र, समजा साप म्हटलं असेल तर गैर काय? कारण महाराष्ट्रात सापाची, नागाची पूजा केली जाते. सापाला देव मानलं जातं. साप हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंचं समर्थन करत संजय राऊत यांनी मोदींना (PM Narendra Modi) टोला लगावला आहे.

 

 

मोदींवरील टीकेला नितेश राणेंचा पलटवार

साप शेतकऱ्याचं प्रतिक आहे. सापाची पूजा केली जात आहे, यावर राग मानू नये, असं संजय राऊत म्हणतात.
मग म्याव म्याव केल्यावर तुमच्या मालकाला राग का आला? मांजर घरी ठेवल्यावर गुड लक येत असे म्हणतात,
असा टोला नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-    Maharashtra Politics News | bjp is burdened by eknath shinde government said mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

BARTI Pune – Social Welfare | ‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत कार्यशाळेत कायद्यांविषयी जनजागृती

SPPU News – International Dance Day | 29 एप्रिल 2023 : आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस – विद्यार्थी, कलासक्तांचा एक खुला रंगमंच ‘ अंगणमंच ‘..!

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

 

The post Maharashtra Politics News | ‘शिंदे सरकारचं भाजपला ओझं झालं’, राऊतांच्या टीकेला भाजप आमदारांचं प्रत्युत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article