Header

NCP Chief Sharad Pawar | अजित पवारांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाबाबतच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…

NCP Chief Sharad Pawar | अजित पवारांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाबाबतच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार बंडखोरी करणार असल्यापासून ते ते त्यांना मुख्यमंत्री (Chief Minister) करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याकडे दिल्याच्या चर्चांमुळे ते सध्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान मुंबईत बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) संदर्भात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारच ‘भावी मुख्यमंत्री’ असल्याचे बॅनर्स लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांनी पुणे, धाराशिवनंतर मुंबईत देखील अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरवर अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला आहे. यावर शरद पवार यांना विचारले असता, हा वेडेपणा करु नका, असं अजित पवारांनीच सांगितलं आहे असं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. अजित पवार यांनीच यावर नाराजी जाहीर केली आहे. असा वेडेपणा करु नका असं ते म्हणाले आहेत, असं शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कुठलाही प्रकल्प होताना…

बारसू इथं रिफायनरी प्रकल्पाचा (Ratnagiri Refinery Survey) प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातच दिला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. पण असा काही प्रस्ताव नाही आणि ही टेबल न्यूज असल्याचे शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी काय पत्र लिहलं मला माहित नाही. मात्र, कुठलाही प्रकल्प होताना स्थानिकांचे मत घेतलं गेलं पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp leader sharad pawar on ajit pawar banner future cm maharashtra

 

हे देखील वाचा :

New National Education Policy (NEP) | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे

Nana Patole | ‘… तर काँग्रेसचा प्लान तयार’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

Chandrakant Patil | ‘… पण मी पालकमंत्री म्हणून पाणी सोडता येत नाही’ – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

Uday Samant | उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

 

The post NCP Chief Sharad Pawar | अजित पवारांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाबाबतच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article