Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून साडेपाच लाखांना घातला गंडा; उत्तर प्रदेशातील आमदाराच्या नावाचा टोळी करते वापर

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून साडेपाच लाखांना घातला गंडा; उत्तर प्रदेशातील आमदाराच्या नावाचा टोळी करते वापर

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | बनावट नोटा (Fake Notes) बनविण्याचा डेमो दाखवून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटविली जाते. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीने एकाला तब्बल ५ लाख ३४ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातला. पैसे परत मागितल्यावर पिस्टलने जीव मारण्याची धमकी दिली. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत खराडी येथे राहणार्‍या एका ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (रा. निलंगा, लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वानवडीतील एस आर पी एफ ग्रुपजवळ ३० मार्च ते २० एप्रिल २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली राऊत हिने आपण मंत्री असल्याचे व संजयकुमार पांडे याने उत्तर प्रदेशात आमदार असल्याचा बनाव केला. या टोळीने भारतीय चलनातील वाटणार्‍या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना वानवडी येथे बोलावून घेतले. त्यांना ते कसे बनवायचे याचा डेमो दाखविला. प्रत्यक्षात त्या खर्‍या नोटाच ते हातचलाखी करुन आपण केमिकलच्या सहाय्याने तयार करतो असे दाखविले. त्यासाठी त्यांच्या मोठ्या ओळखी आहेत. संजयकुमार पांडे हे उत्तर प्रदेशचे आमदार असल्याचे सांगितले. अशा डेमोतून बनविलेल्या ५-६ नोटा त्यांना दिल्या. त्यांनी त्या वापरल्या व कोणाला संशय आला नाही. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना भारतीय चलनातील हुबेहुब ३० लाख रुपयांच्या नोटा देतो, असे सांगितले. त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. तेव्हा त्यांनी ५ लाख ३४ हजार रुपये दिले. हुबेहुब रुपये देतो, असे सांगून त्यांना पैसे दिले नाही. तसेच त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना पिस्तुलने जीव ठार मारण्याची धमकी दिली. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Wanwadi Police Station – 5.5 Lakhs extorted by showing demo of making fake notes; A gang uses the name of an MLA from Uttar Pradesh

 

हे देखील वाचा :

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Roll Ball World Cup Tournament In Pune | सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा, केनिया संघाला दुहेरी मुकुट; भारत उपविजेता ! रोलबॉल खेळाचा ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील – चंद्रकांत पाटील (Video)

Pune River Rijuvenation Project | विकास आणि पर्यावरण रक्षण याकरिता पर्यावरण प्रेमी नागरिक आणि प्रशासनातील समन्वय वाढविण्याची गरज ! वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले – ‘वृक्षांच्या पुनर्रोपणाबद्दल महापालिकेचे अभिनंदन’

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून साडेपाच लाखांना घातला गंडा; उत्तर प्रदेशातील आमदाराच्या नावाचा टोळी करते वापर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article