Pune Crime News | खेड : पुर्ववैमनस्यातून 6 जणांकडून युवकाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून 6 जणांनी धारदार हत्याराने सपासप वार करून युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.6) खेड तालुक्यातील चांदुस – वाळुंज वस्ती येथे घडली (Murder In Khed). यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी खून (Pune Rural Police) प्रकरणी दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News )
शुभम निवृत्ती काळे (20, रा. काळेबडे वस्ती, चांदुस, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यशराज विजय वाघमारे, संदिप अशोक कल्हाटकर, सुरज गोगावले (रा. कोरेगाव, ता. खेड), वैभव कोळेकर (रा. कडाची वस्ती, किवळे, ता. खेड), शुभम उर्फ सोन्या चंद्रकांत कारले (रा. विठ्ठलवाडी, चांदुस, ता. खेड) आणि करण कारले यांच्याविरूध्द खेड पोलिस ठाण्यात (Khed Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे 2 वर्षांपुर्वी शुभम काळे याच्यासोबत आरोपींची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. काही दिवसांपुर्वी खुन्नसने पाहण्यावरून देखील त्यांच्यातील वैमनस्य आणखीनच वाढले होते. गुरूवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शुभम काळे हा घराकडे जात होता. वाळुंज वस्ती येथे आरोपींनी त्याला गाठले. त्याच्या तोंडावर व हातावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घाव वर्मी लागल्याने शुभम हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 6 पैकी दोघांना अटक केली आहे. पाहिजे असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सुरू आहे.
Web Title :- Pune Crime News | Khed: A youth was stabbed to death with a sharp weapon by 6 people due to previous enmity.
हे देखील वाचा :
Deepak Kesarkar | ‘राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री, त्यामुळे…’- दीपक केसरकर
Sandeep Deshpande | ‘म्हणून ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न’, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
The post Pune Crime News | खेड : पुर्ववैमनस्यातून 6 जणांकडून युवकाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून appeared first on बहुजननामा.