Header

Sandeep Deshpande | ‘म्हणून ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न’, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

Sandeep Deshpande | ‘म्हणून ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न’, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  ठाणे हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यापूर्वी ठाण्याला बालेकिल्ला मानत होते. मात्र आता ते मानत नाहीत. त्यामुळे याच ठाण्यात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (CM Eknath Shinde) खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर यावरुन मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. वरळीतून पुन्हा निवडून येणार नाही म्हणून ठाण्यात पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना? असा खोचक सवाल देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. देशपांडे म्हणाले, वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे. आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना? असा टोला देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

 

 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आज ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एक दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं. मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते.

 

Web Title :  Sandeep Deshpande | the people of worli not happy with the mla who was elected by setting mns sandeep deshpande on aditya thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकण : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या

Rapper Ram Mungase Arrest | 50 खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक, रोहित पवारांचा संताप; म्हणाले – ‘तर हा सरकारचा कबुली जबाबच नाही का?’

Pune Job Fair | पुण्यात 2023-24 मधील पहिला रोजगार मेळावा 12 एप्रिलला

 

The post Sandeep Deshpande | ‘म्हणून ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न’, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article