Header

Pune Crime News | अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | आपल्या अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून जीवे ठार मारण्याची धमकी पुणे शहर पोलिस दलातील (Pune City Police) एका पोलीस उपनिरीक्षकांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) प्रविण नागेश जर्दे या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे (PSI Pravin Nagesh Jarde). प्रविण जर्दे हा सध्या शिवाजीनगर कोर्ट आवार (Shivaji Nagar Court, Pune) येथे नियुक्तीला आहेत. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत.
तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होते. तिने हे प्रविण जर्दे यांना सांगितले.
त्यावरुन प्रविण जर्दे त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.
यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे.
तसेच त्यांनी कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.
यामुळे फिर्यादी व त्यांच्या घरचे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी हिंमत करुन पोलिसांकडे गेले.
कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अप्पर आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar)
यांनी पीएसआय जर्दे यांना पोलिस दलातून निलंबीत (PSI Pravin Jarde Suspended) केले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Threat to lover’s husband from immoral relationship! If you say anything to her anymore, meet me, I will kill you all; Case filed against PSI; Sub-inspector’s hasty suspension, know case

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘मोक्का’च्या गुन्हयात फरारी असलेला सराईत गुन्हेगार अन् टोळीचा म्होरक्या जंगळया सातपुतेला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Garbage Depots Uruli Devachi – Fursungi | उरूळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोचा मागील 20 वर्षांत कायापालट ! अभ्यासकांसाठी पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार; अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

NCP MLA Sunil Tingre | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका अ‍ॅकशन मोडवर ! आमदार टिंगरे यांच्या उपोषनाला यश; भिंत तोंडून आमदारांनी रस्ताच केला मोकळा

 

The post Pune Crime News | अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article