Header

Pune Crime News | मार्केटयार्ड : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | मार्केटयार्ड : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | भाजी मार्केटमध्ये लिंबु विक्री करणार्‍या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याबद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीचा (Krushi Utpanna Bazar Samiti ) निलंबित प्रशासकासह २० ते २५ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार (Atrocities Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२३) दिली आहे. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासक मधुकांत गरड (Madhukanta Gard), दत्तात्रय कळमकर (Dattatraya Kalamkar), संभाजी काजळे (Sambhaji Kajle), अमोल घुले (Amol Ghule) व इतर २० ते २५ जणांवर विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान माकेटयार्ड येथील भाजी मार्केटमध्ये (Marketyard Pune) घडला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी मार्केट येथे लिंबु विक्रीचा व्यवसाय करत असत. मधुकांत गरड याने फिर्यादीस मारहाण (Beating) करुन त्यांच्या लिंबुच्या मालाची चोरी करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन येथे येऊन धंदा करुन काय मार्केट नासवत आहे काय असे म्हणाला. कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोक तेथे येऊन फिर्यादी यांचे लिंबुच्या पाट्या व पिशव्या फेकून देऊन मार्केटमध्ये येऊन २० ते ३० लोकांना चिथावणी देऊन फिर्यादी यांच्या अंगाला हात लावून अश्लिल बोलला. एके दिवशी फिर्यादी या लिंबु विक्री करत असताना मधुकांत गरड याने त्यांच्याकडे पाहुन अश्लिल हावभाव त्यांच्या छातीच्या खाली हात लावून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे (ACP Purnima Taware ) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Marketyard: A case of atrocity including molestation has been filed against the suspended administrator of the Krushi Utpanna Bazar Samiti

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

CM Eknath Shinde | ‘मी चंद्रकांत पाटलांशी बोललो… त्यांची बाळासाहेबांबद्दल भूमिका स्पष्ट आहे’, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

 

The post Pune Crime News | मार्केटयार्ड : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article