Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मी दिलेल्या पामोलिन कुत्र्याचा (Palmolein Dog) तु पाय मोडला आहेस असे म्हणुन मित्राने मित्रालाच मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) परिसरातील तिरूपतीनगरमध्ये (Tirupati Nagar) घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश आवळे (38, रा. पांचाळ वस्ती, धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विशाल सुनिल पवार (38) यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश आवळे आणि विशाल पवार हे एकमेकांचे मित्र आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गणेश आवळेने विशाल पवार यांच्या घराजवळ येवुन मी दिलेल्या पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस, असे म्हणुन मारहाण केली. गणेशने विशालचे काहीएक ऐकुन घेतले नाही. त्याने हातातील काठीने देखील विशालच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune-Dhankawadi Crime News : Sahakarnagar Police Station – Why Are You Brok The Lags Of Palmolein Dog
हे देखील वाचा :
Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’
The post Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण appeared first on बहुजननामा.