Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – चांदणी चौकाच्या अलिकडे जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश, 6 गुन्हयांची उकल

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – चांदणी चौकाच्या अलिकडे जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश, 6 गुन्हयांची उकल

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चांदणी चौकाच्या (Chandani Chowk) अलिकडील परिसरात कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणार्‍यांचा हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) पर्दाफाश केला आहे. टोळीच्या म्होरक्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आली आहे (Robbery In Chandani Chowk Pune) पोलिसांनी 1 लाख 18 हजार 700 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

रामदास बबन कचरे Ramdas Baban Kachre ( 22, रा. सोलमलोन, ता. महाड, जि. रायगड. सध्या रा. डोनजे गाव, ता. हवेली, जि पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 एप्रिल 2023 रोजी सदरील गुन्हयातील फिर्यादी यश नागेश मळगे (30, रा. कोथरूड – Kothrud) हे रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकाच्या अलिकडे असणार्‍या काचेच्या बिल्डींग शेजारील सर्व्हिस रोडवर (बावधन – Bavdhan) येथे फोनवर बोलत उभे होते. त्यावेळी आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या खिशामील पैशाचे पाकीट काढून मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. आरोपीनीं त्यांच्याकडील मोटारसायकल देखील जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

हिंजवडी पोलिस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने सलग 10 दिवस चांदणी चौक, बावधन ते लवासा (Bavdhan To Lavasa), पौड (Paud), खडकवासला (Khadakwasla) आणि इतर भागातील सुमारे 65 सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. त्यावेळी खडकवासला परिसरातील रेकॉर्डवरील (Criminals On Pune Police Records) आरोपी रामदास बबन कचरे याच्याशी मिळते-जुळते वर्णनाचे फुटेज असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस पथकाने आरोपी रामदास कचरेचा माग काढण्यास सुरूवात केली.

 

पोलिसांनी सिंहगड पायथा (Sinhgad Paytha), लवासा परिसर, मुठा गाव (Mutha Gaon), ताम्हीणी घाट (Tamhini Ghat) परिसरात वेषांतर करून सापळा रचला मात्र आरोपींना चाहूल लागली आणि त्यांनी पलायन केले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बंडु मारणे (Police Bandu Marne) यांना आरोपी कचरे हा मुळशी तालुक्यातील माण येथील बापुजी बुवा मंदिर परिसरात असल्याची माहिती समजली. पोलिसांनी सापळा रचुन आरोपी रामदास कचरे आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3, पौड पोलिस स्टेशनच्या (Paud Police Station) हद्दीत 2 आणि हवेली पोलिस स्टेशनच्या (Haveli Police Station) हद्दीत 1 असे एकुण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी आरोपींकडून गुन्हयातील चोरलेली मोटारसायकल, सोन्याची चैन, चोरलेले मोबाईल आणि गुन्हयात वापरलेली हत्यारे असा एकुण 1 लाख 18 हजार रूप्याचा ऐवज जप्त केला आहे.

 

पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे, पोलिस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव, नरेल बलसाने आणि सागर पंडित यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News : Hinjewadi Police Station – Chandni Chowk busted recently, 6 crimes solved

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI | संजय राऊत यांच्याकडून भाजप आमदार व भीमा-पाटस सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

Devendra Fadnavis | ‘कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात?’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

Rajiv Gandhi Zoological Park Pune | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राणीही घेताहेत ‘ठंडा ठंडा कुल कुल’चा अनुभव ! ऊन आणि उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना; आहारातही बदल

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

 

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – चांदणी चौकाच्या अलिकडे जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश, 6 गुन्हयांची उकल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article