Header

Pune Crime News | अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील महिला आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Pune Crime News | अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील महिला आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | अपहरण (Kidnapping) आणि बलात्कार (Rape) गुन्ह्यातील आरोपी हलिमा नासीर शेखची (Halima Naseer Shaikh) जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश के.के. जहागिरदार (Judge K. K. Jahagirdar) यांनी आदेश काढल्याची माहिती अॅड. प्रशांत सी पवार (Adv. Prashant C Pawar) यांनी दिली. याबाबत (Pune Crime News) 10 मे 2021 रोजी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 363,376(2)(एन) व 17 यासह पॉक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

आरोपी हलिमा शेख हिने पीडित मुलीचे राहत्या घरातून अपहरण केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र (Charge Sheet) दाखल करुन खटला चालू करण्याचे आदेश (Pune Crime News) दिले होते. आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत पवार यांनी वकिलपत्र दाखल करुन खटला चालवला. या प्रकरणातील सर्व साक्षीदार सरकार पक्षाकडून व बचाव पक्षाकडून तपासण्यात आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

खटल्यातील सर्व साक्षीदार तपासल्यानंतर अंतिम युक्तिवाद दोन्ही पक्षांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, सरकार पक्ष आरोपीला दोषी ठरवण्यात असमर्थ झाले व बचाव पक्षाकडून अॅड. प्रशांत पवार यांनी योग्य युक्तिवाद केला. आरोपीचे वकील अॅड. पवार यांनी आरोपी विरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे कोर्टाला सांगितले व सबळ पुरावे नसल्याने आरोपीची मुक्तता करावी असा युक्तिवाद त्यांनी केला.

 

अॅड. प्रशांत पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे (District and Sessions Court) न्यायाधीश के.के. जहागिरदार यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात बचाव पक्षाचे अॅड. प्रशांत पवार यांना अॅड. मिथुन चव्हाण (Adv. Mithun Chavan) यांनी योग्य मार्गदर्शन केले.

 

 

Web Title :-   Pune Crime News Acquittal of female accused in kidnapping, rape by District and Sessions Court

 

हे देखील वाचा :

Aaryans Group Of Companies | आर्यन्स ग्रुपच्या वतीने मराठी कलाकारांसाठी सन्मान सोहळ्याची घोषणा; मंत्री दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती

Pune Lady Doctors Fashion Show | महिला डॉक्टरांच्या चॅरिटी फॅशन शो मधून दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स व मुलींना एचपीव्ही लसीकरण मोफत (Video)

 

The post Pune Crime News | अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील महिला आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article