Header

Uday Samant | मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी गेले? तर्कवितर्कांवर उदय सामंत म्हणाले…

Uday Samant | मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी गेले? तर्कवितर्कांवर उदय सामंत म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोकणात बारसु रिफायनरी सर्वेक्षणावरुन (Barsu Refinery Survey) राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या गावी गेले आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री नाराज असल्याने ते गावी निघून गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री नाराज नसून त्यांच्या गावची जत्रा आहे. त्यामुळे ते गावी गेल्याचे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी निघून गेले, या चर्चांवर बोलताना उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहेत, असं कुणी म्हणत असेल तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे, असे सामंत (Uday Samant) म्हणाले.

 

 

चर्चा तथ्यात उतरतील तेव्हा…

दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठक होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) आहे. यावर उदय सामंत म्हणाले, राजकीय वर्तुळात आठ दिवसांपासून चर्चा सुरु आहेत की, उरलेल्या तेरा आमदारांपैकी सात आमदार आमच्यासोबत येणार आहेत. राष्ट्रवादी (NCP) फुटणार आहे अशीही चर्चा आहे. काँग्रेसचा (Congress) बडा नेता भाजपात (BJP) जाणार अशी देखील चर्चा आहे. राजकीय वर्तुळात खुप चर्चा आहेत. त्या तथ्यात उतरतील तेव्हा त्याचा विचार करु असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच पुढील दीड वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असून त्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणुका होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

 

अपेक्षे प्रमाणे आंदोलन झाले नाही

बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना उदय सामंत म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांनी काय मागणी केली हा नंतरचा विषय आहे. मात्र त्या ठिकाणची वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन ज्या पद्धतीने होईल असं अपेक्षित होतं तसं आंदोलन होत नाही असं विरोधकांना कळलं. लोकांची समजूत काढण्यासाठी प्रशासन तत्पर आहे म्हणून या गोष्टी घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विरोधकांवर निशाणा साधताना उदय सामंत म्हणाले, मला सगळ्याच पक्षांना विनंती करायची आहे की, जर सर्वक्षण थांबवायचं असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि हा उद्योग आम्ही घालवत आहे अशी भूमिका घ्यावी. मग पाहूयात काय करायचे ते, असं आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

 

 

Web Title :- Uday Samant | minister uday samant comment on speculations of unhappy cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Mula Mutha River Rejuvenation Project | मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा समावेश नाही; समाज माध्यमांवर फिरत आहे चुकीची आकडेवारी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Barsu Refinery Survey | बारसू रिफायनरी सर्वेक्षण ‘पेटलं’, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Sharmila Oswal- Millet Evangelist Of India | जागतिक वसुंधरा दिन : जीतो पुणे लेडीज विंग, आरोग्य विभाग – भरड धान्याचे आगार असलेल्या भारतात जगाची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिरूर पोलिस स्टेशन (पुणे ग्रामीण) – सख्खा भाऊ बनला पक्क वैरी ! 28 वर्षीय वहिनीचा खून तर भावाच्या खुनाचा प्रयत्न

 

The post Uday Samant | मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी गेले? तर्कवितर्कांवर उदय सामंत म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article