Header

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी; जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी; जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Coup in Karnataka? Big lead for Congress in counting of votes; Know party strength during counting of votes

बहुजननामा ऑनलाईन – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आज (शनिवार) सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली आहे. विधानसभेसाठीच्या 224 जागांचा निकाल आज लागणार आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. कर्नाटकामध्ये 224 जागांसाठी एकूण 2615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कर्नाटकमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड सुमारे 38 वर्षांपासून सुरू आहे. यंदा सत्तापालट होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मतमोजणीमध्ये काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार कर्नाटक विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 121 जांगावर आघाडी मिळवत अव्वलस्थानी आहे तर भाजपा 71 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर (अपक्ष) हे 7 जागांवर आघाडीवर आहेत. (Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis)

38 वर्षापासुन कर्नाटकामध्ये सुरू असलेला ट्रेंड कायम राहणार असेच चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. कर्नाटकामध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार आणि काँग्रेसकडे सत्ता येणार असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसते मात्र अद्याप तरी कुठल्याही जागेवरील निकाल घोषित झालेला नाही. केवळ मतमोजणीमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. अशीच आघाडी कायम राहिल्यास कर्नाटकामध्ये सत्तापालट होईल असे चित्र आहे

 

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Coup in Karnataka? Big lead for Congress in counting of votes; Know party strength during counting of votes

 

हे देखील वाचा :

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : मित्रांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणार्‍याला सराईत गुन्हेगाराला अटक

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : सामाजिक सुरक्षा विभाग – बंडगार्डनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर छापा, 8 जणांवर कारवाई

 

The post Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी; जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article