Header

Maharashtra Politics News | लव्ह जिहाद प्रकरणावरुन पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला, राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपवर घणाघात; म्हणाले- ‘भाजपला लाज शरम असेल तर…’,

Maharashtra Politics News | लव्ह जिहाद प्रकरणावरुन पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला, राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपवर घणाघात; म्हणाले- ‘भाजपला लाज शरम असेल तर…’,

Maharashtra Politics News | amol mitkari slams gopichand padalkar over statement on supriya sule nitesh rane

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटावरून देशातील राजकारण तापले असताना आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी लव्ह जिहाद प्रकरण (Love Jihad Case) घडल्याचा दावा केला आहे. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना घेऊन त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत, मला लव्ह जिहाद माहिती नाही असं म्हणणारे पीडित तरुणीला आणि कुटुंबीयांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेणार का (Maharashtra Politics News) असा प्रश्न विचारत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना टोला लगावला.

याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपमध्ये (BJP) आहेत. त्यातला हा एक गोपीचंद पडळकर. त्यांना सांगितलं आहे शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे, अजित पवार (Ajit Pawar), रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर तू बोलायचं. मग तुझी कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Maharashtra Politics News)

मिटकरी पुढे म्हणाले, पण या पडळकरला ज्ञान नाही की, कॅबिनेटमध्ये जायला अक्कल आणि बुद्धी लागते.
कितीही जहरी टीका केली तर जहर ओकणाऱ्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जात नाही.
किमान तेवढी लाज शरम भाजपात असेल तर या वाचाळवीरांना गप्प करतील.
नितेश राणे (Nitesh Rane) असतील किंवा पडळकर असतील यांच्यात कॅबिनेट मंत्री पदावरून स्पर्धा सुरु आहे. जितकं खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढं बोलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

Web Title : Maharashtra Politics News | amol mitkari slams gopichand padalkar over statement on supriya sule nitesh rane

The post Maharashtra Politics News | लव्ह जिहाद प्रकरणावरुन पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला, राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपवर घणाघात; म्हणाले- ‘भाजपला लाज शरम असेल तर…’, appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article