Header

Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स

Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स

Shubman Gill | Photo of Shubman Gill and Sachin Tendulkar going viral; Amazing comments from netizens

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार प्लेअर शुभमन गिल (Shubman Gill) याचे नाव सध्या देशभर गाजते आहे. आयपील २०२३ मध्ये त्याने केलेल्या दमदार खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचबरोबर ‘सारा’ या नावामुळे देखील त्याला ट्रोल (Troll) केले जाते आहे. नुकताच त्याचा सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक लोक कमेंट्स करत आहे. (Shubman Gill)

क्रिकेटर शुभमनने आयपील २०२३ (IPL 2023) मध्ये ऑरेज कॅप (Orange Cap) मिळवली असून संपूर्ण सीझन व क्वालिफायर मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शतकीय खेळीच्या जोरावर आरसीबीला (RCB) प्ले ऑफमध्ये जाण्यापासून रोखले आणि मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला. त्याच शुभमनच्या शतकाच्या जोरावर गुजरातने २६ मे रोजी मुंबई इंडियन्सला बाहेरचा रस्ता दाखवला आणि गुजरातने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. काल झालेल्या या सामन्यामध्ये शुभमन गीलचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Master Blaster Sachin Tendulkar) सोबतचा फोटो तुफान व्हायरल होतो आहे. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

शुभमन हा क्रिकेटसोबत आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असतो ते म्हणजे ‘सारा’. शुभमन गिलचे नाव कधी सिनेसृष्टीतील सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत जोडले जाते तर कधी सचिनची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) सोबत जोडले जात असते. अशातच सचिनसोबतचा शुभमनचा एक फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोत दिसतं आहे की सचिन काहीतरी शुभमनला सांगत आहे आणि शुभमन ते सर्वकाही शांतपणे ऐकतोय. हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या क्वालिफायर सामन्यादरम्यानचा फोटो आहे. या फोटोमुळे सारा तेंडूलकर व शुभमन गिलचे (Shubman Gill) नाव जोडले जात असून या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहे. ट्रोलर्सने या फोटोला उचलून धरले असून अनेक मिमस् यावर बनवले जात आहे.

यावर नेटिझन्सनी (Netizens) फारच मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. सचिन शुभमनला काय सांगत असेल याबाबत भन्नाट अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘या सीझनमध्ये ५ सेंच्युरी केल्यास तरंच लग्न होईल, नाहीतर विसरुन जा’. अन्य एकाने लिहिले की, ‘वर्ल्डकप जिंकलास तर लग्न ठरेल’. तर एका युजरने लिहिले की, ‘सचिन असे म्हणतोय की सॉरी शुभमन आजच्या मॅचनंतर साराचा हात तुझ्या हातात नाही देऊ शकत’.अशा कमेंट्स सोशल मीडियावर केल्या जात आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title : Shubman Gill | Photo of Shubman Gill and Sachin Tendulkar going viral; Amazing comments from netizens

The post Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article