Header

Pune Crime Fire News | सातारा रोडवरील इंद्रनील सोसायटीमधील चार दुकाने भीषण आगीत जळून खाक; दोघे जण जखमी, स्फोटाने दुमजली इमारतीत पडझड (Video)

Pune Crime Fire News | सातारा रोडवरील इंद्रनील सोसायटीमधील चार दुकाने भीषण आगीत जळून खाक; दोघे जण जखमी, स्फोटाने दुमजली इमारतीत पडझड (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Fire News | सातारा रोडवरील बसस्टॉपसमोरील (Satara Road) इंद्रनील सोसायटीमधील (Indranil Society) चार दुकानांना मध्यरात्री भीषण आग लागून त्यात चारही दुकाने व एक मौटारसायकल जळून खाक झाली. या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. आगीनंतर स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य रस्त्यावर येऊन पडले होते. (Pune Crime Fire News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

इंद्रनील सोसायटीतील देवयानी इलेक्ट्रॉनिक्स (Devyani Electronics), गृहिणी किचन (Grihini Kitchen) आणि देवयानी मोबाईल शॉपी (Devyani Mobile Shop) अशी चार गाळे होते़ ते संपूर्ण जळून खाक झाले.

 

इंद्रनील सोसायटीतील या दुकानांना पहाटे २ वाजून २२ मिनिटांनी आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) नियंत्रण कक्षाला मिळाली. त्याबरोबर कात्रज, कोंढवा, सिंहगड रोड केंद्राच्या एकूण ६ गाडया, २ वॉटर टँकर व एक रुग्णवाहिका तातडीने रवाना झाल्या. परंतु, आगीची वर्दी उशीरा मिळाल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या तेथे पोहचेपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. त्यात एका पाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले. स्फोट इतके मोठे होते की, त्यात दोन मजली इमारतीची मोठी पडझड झाली आहे. दुकानाचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा, दुकानातील गॅस शेगड्या व इतर साहित्य मुख्य सातारा रस्त्यावर येऊन पडले. संपूर्ण रस्त्यावर काचांचा खच पडलेला दिसून येत होता. या आगीत एक मोटारसायकलही जळून खाक झाली. या भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. (Pune Crime Fire News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या दुर्घटनेत सातारा रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर साहित्य पडले होते. त्यामुळे काही वेळ या रस्त्याची एक बाजू बंद करण्याची वेळ आली होती. आग विझविल्यानंतर सफाई कामगारांनी तातडीने हे साहित्य, राडारोडा बाजूला करण्याचे काम हाती घेतले.

 

 

Web Title :  Pune Crime Fire News | Four shops in Indranil Society on Satara Road gutted in a fierce fire; Two people injured, two-storey building collapsed due to explosion

 

हे देखील वाचा :

Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : बकोरी-केसनंद रोडवर 2 कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

Pune Zilla Parishad News | पुणे जिल्हा परिषद : उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळा ! चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर’

Pune Aam Aadmi Party | नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात चिपको आंदोलन

Shivrajyabhishek Sohala | 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

The post Pune Crime Fire News | सातारा रोडवरील इंद्रनील सोसायटीमधील चार दुकाने भीषण आगीत जळून खाक; दोघे जण जखमी, स्फोटाने दुमजली इमारतीत पडझड (Video) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article