Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Kothrud Police Station - 23 people cheated of Rs 43 lakh by luring them to work for the company; A case has been registered against five people of Click and Brush Company

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | दिवसाला ५ ते ७ हजार रुपये कमवा, असे आमिष दाखवून मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist), हेअर स्टायलिस्ट (Hair Stylist), फोटोग्राफर (Photographer), मॉडेल डिझायनर (Model Designer) यांच्याकडून २ वर्षांचे सबस्क्रिप्शनचे पैसे देऊन त्यांना तात्पुरते काम दिले. त्यानंतर कंपनी अडचणीत असल्याचे सांगून २३ जणांची तब्बल ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी श्रद्धा चंद्रकांत अंदुरे (Shraddha Chandrakant Andure), योगेश मदनलाल मुंदडा (Yogesh Madanlal Mundada), जय पंकज चावजी (Jay Pankaj Chavji), शुभम जयप्रकाश पगारे (Shubham Jayprakash Pagare), अनिरुद्ध बिपीन रासणे (Anirudh Bipin Rasane) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील भुसारी कॉलनीतील क्लिक अँड ब्रुश कंपनीमध्ये (Click and Brush Company) ९ मार्च २०२३ ते ६ मे २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांचे कंपनीमध्ये काम देतो, असे म्हणून इंस्ट्राग्राम,
फेसबुकद्वारे जाहीरात केली. त्यात दिवसाला ५ ते ७ हजार रुपये कमवा, असे आमिष दाखविले.
त्यासाठी मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर यांच्याकडून ३ महिने व २
वर्षांसाठी सबक्रिप्शनचे (Subscription) पैसे घेतले. त्यांना तात्पुरते पैसे दिले.
त्यानंतर कंपनी अडचणीत असून काम बंद केल्याचे सांगितले.
कामाचे व सबस्क्रिप्शनचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांची तात्पुरती समजूत काढली.
वेळोवळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांची दिशाभूल केली. शेवटी आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे
लक्षात आल्यावर या सर्वांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांना आतापर्यंत २३ जणांची ४३ लाख ९३ हजार
रुपयांची फसवणूक झाल्याचे अर्ज मिळाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण (API Chavan) तपास
करीत आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title :  Pune Crime News | Kothrud Police Station – 23 people cheated of Rs 43 lakh by luring them to work for the company; A case has been registered against five people of Click and Brush Company

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआची समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समितीत समावेश; ठाकरे गटाकडून कोण? उद्धव ठाकरे घेणार निर्णय

ACB Demand Case | 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मोबाईल पाहिल्याने पत्नीला मारहाण करुन केला छळ

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article