Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे तरुणाने आत्महत्या (Suicide In Pune) केली. त्यानंतर पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे (Fake Documents) फ्लॅट व जागा स्वत:च्या नावावर केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संतोषकुमार बाबासो कोरे (Santosh Babasaheb Kore) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांची आई यशोदा बाबासो कोरे (वय ५५, रा. कोळे ता. सांगोला – Sangola, जि. सोलापूर – Solapur) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिांनी रविना संतोषकुमार कोरे (रा. वरंवड), रंजना दामोदर इरळे, दामोद इरळे, संग्राम दामोदर इरळे, गणेश दिवेकर यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार याचा विवाह रविना हिच्याबरोबर २०१९ मध्ये झाला होता. ते शेवाळवाडी येथील ग्रॅन्डलिला सोसायटीत रहात होते. रविना व तिच्या माहेरच्या लोकांकडून मालमत्तेसाठी त्याचा छळ होत होता. या छळाला कंटाळून संतोषकुमार याने ३१ ऑगस्ट २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोषकुमार हा फोन उचलत नसल्याचे लक्षात आल्यावर चार दिवसांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याने गळफास (Galfas In Pune) घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले होते.
त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याची पत्नी रविना हिने त्याचे खात्यावरुन पैसे काढून घेतले.
तसेच त्याच्या नावावर असलेले फ्लॅट व जागा बनावट कागदपत्रे सादर करुन स्वत:च्या नावावर करुन
फिर्यादीची फसवणूक (Cheating Case) केली. यशोदा कोरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार (Shivaji Nagar Court Order) सीआरपीसी १५६/३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Hadapsar Police Station – Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents
हे देखील वाचा :
Pune Mahavitaran News | महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणेकरांनी गाठला लाखाचा टप्पा
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न
The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली appeared first on बहुजननामा.